आम्ही जलासृष्टी रिसॉर्ट ला सध्याच फेब मध्ये गेलो होतो. रिसॉर्ट अतिशय सुंदर आणि निसर्ग सानिध्य लाभलेलं आहे. आम्ही कुटुंबासह फार प्रवास केला आहे आज पर्यंत पण जळसृष्टी चा अनुभव अगदीच आल्हाद दायक होता. त्यांची सर्व्हिस, मग ती बेल बॉय असो, रेस्टॉरंट स्टाफ असो, रूम बॉय असो, सर्वजण हसतमुख आणि चटकन उपलब्ध असतात. अगदी आपुलकीने चौकशी करतात. इथले जेवण घरच्यासारखे आहे. ब्रेकफास्ट, लंच, डीनर..... एकंदर पूर्ण अनुभव सुखद आहे. संध्याकाळी चहा नाश्ता साठी ट्रॅक्टर, घोडा, सायकल यापैकी कशानेही जाण्यात मजा आहे. आम्ही ट्रॅक्टर ने long ride घेतली. चहा घेताना मंद वीणा वादन असतें. निसर्गाच्या सानिध्यात चहा घेताना नदी किनारा आणि वीणा वादन, आहाहा काही औरच सुख. सकाळी तुम्ही कितीही वाजता उठा पण मी म्हणेन जर निसर्गाचा आणि खास करून जलसृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर ७ वाजता तरी उठा. सकाळी बासरी वादक पूर्ण रिसॉर्ट भर अलगुज बासरी वाजवत फिरतो. हा ही अनुभव काही औरच..... श्वेत बदकं आणि त्यांचं कुटुंब, त्यांचा तिथल्या हिरवळीवरचा वावर, विविध रंगी बोगनवेली कॉटेजवर चढवल्या आहेत त्या फारच सुंदर दिसतात. Entrance ला ek सुंदर वेलीने नैसर्गिक सजावट केली आहे. त्या वेलीची फुले द्राक्षांच्या घोसंसारखी खाली आली आहेत. त्यातून चालताना फार छान वाटते. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असं रिसॉर्ट आहे. मी तर म्हणेन आयुष्यात एकदा तरी जलासृष्टीला visit कराच. According to me, best season to visit is Dec to Feb end. I am very thankful to all the staff of Jalsrushti resort for going out of the way to service their guest n make them feel most comfortable during their visit.